Indian Films : A Virtually Non-virtual Phenomenon
- A. Charumati Ramdas
Born in 1978 in Smolensk, Sergei Vladimirovich Perelyaev, an upcoming Children’s writer, has already
won a few awards for his works, though he never attempted to write anything
specifically for children – just wrote whatever came to his mind, keeping in mind
the elders. But in spite of this he is considered as a Children’s writer. And
he is not against it.
Sergei Vladimirovich Perelyaev completed Faculty of Journalism from
Moscow State University.
His stories were published in many children’s magazines, during
2004-2005 he worked as an editor in the
famous magazine “Cheburashka”, worked as a correspondent and anchor in Radio;
acted in many Radio-plays.
He is a Laureate of the magazine of the Union of writers of Moscow
"Ring A" (best ironic poems, 2003), Alexander Potemkin award
"Eureka" (nomination "Children's literature", 2006),
national literary award "Cherished dream" (2008) and a few others.
Sergei Perelyaev is a member of Writers’ Association of Moscow.
The book “Indian Films” was published in 2015.
It is worth mentioning that Sergei Perelyaev presented his works in
various forums for young writers, in one of them he was awarded the “Eureka” award in “Children’s
Literature” category; and in another he was recognized as “The Favourite” for
his autobiographical novelette about childhood - “Me and Vladik, relatives and
Friends”
Let us come to the book:
“Indian Films” – for children in the age group 7–10, is a collection of
autobiographical stories - real episodes, sometimes mixed with imagination. It
consists of two parts: First part is “From three to Infinity” and the second –
“The Indian Films”.
Let us examine each part:
“From Three to Infinity” begins with the narration, “When I was three
years old…” and he has dedicated it to his mother who is “best Mother in the
world”.
The narrator himself is protagonist and he describes his life from 3
years till his imaginary death. How? First the child describes how he was
presented a bicycle “Butterfly” and how he met with a minor accident, how the beautiful
sympathetic nurse in the hospital treated him. The child’s world is confined
only to his cycle and parents. No interaction with the outside world except the
“Aunty” whom he tried to save while cycling downhill (it was a silent
interaction) and the nurse at the hospital.
At 4, the protagonist runs away from his house with a cat, because mamma
and daddy asked him to leave the cat away from home after feeding her. The
protagonist is sad that he can’t expect anything from his parents if they can’t
show any affection to the pets. During the journey the cat runs away and the
child is brought home by his father’s friend. So, child starts exploring the
outside world, we observe that feelings like disappointment and anger appear in
his heart.
At 5 he finds a ten ruble note in the compound and he notices how the
behavior of boys changes towards him, he is protected by Veronica and at that
tender age falls in love…notices how people are jealous of his friendship with
Veronica. We notice that now the social circle is getting wider, newer problems
emerge and somehow he is able to get out of them. Similar experience at the age
of six when he gets a big football which belonged to the captain of Spartak
Team…At seven he goes to school, some new experiences, some disappointing
situations…
Love for films starts at the age of 8, when he writes to the local TV
channel to telecast film on Don Quixote…
This continues till he shows these notes to a friend who suggests that
he should imagine his future and include in the notes. So the protagonist
decides that the incidents of future life should be described in the
autobiography…and that he has to visualize them. Thus begins the next chapter
“When I will be…” and it depicts the dreams of a young boy about his life, his
aspirations. This is going to be a life like all other people, a rich life,
with a happy family and he leaves the world with satisfaction, surrounded by
his grand children…
The second chapter of “Three to Infinity” is “Mera
Naam Joker” let’s have a look how it affected the protagonist. Beautiful and
powerful narration in very simple words, it shows how the protagonist
sacrifices his love for the sake of Raj Kapoor. Here is the short (translated)
extract:
इण्डियन फ़िल्म्ससारखीच नास्त्यादेखील बघतांक्षणीच आवडली. सुरुवातीला आमचे
खूप छान चालले होते,
पण मग ( ते पण, कदाचित
बघतांक्षणीच) नास्त्याला जुनी हिन्दी फिल्म ‘मेरा नाम जोकर’ आवडली नाही आणि आम्हीं वेगळे झालो.
हे सगळं असं झालं.
नास्त्या माझ्या घरी आली,
आम्हीं कॉफ़ी प्यायलो, आणि मी म्हटलं,
चल, एखादी फिल्म बघूं या. जशी,
‘मेरा नाम जोकर’.
“चल,
बघू या,” नास्त्या म्हणाली.
मी कैसेट लावली,
आणि स्क्रीन वर दिसलं : ‘राज कपूर फिल्म्स
प्रेज़ेन्ट्स’. माझ्या डोळ्यांत एकदम पाणी आलं आणि सर्कसच्या
अरेनांत रंगीबेरंगी रिबन्सच्या, फुग्ग्यांच्या
कल्होळात जोकरची ड्रेस घातलेला राजकपूर आला. लगेच त्याच्याजवळ पांढरे एप्रन्स
घातलेले बरेच लोक धावत-धावत आले. प्रत्येकाच्या हातांत कातरी होती.
“तुमच्या हार्टचं
ऑपरेशन करावं लागणारेय,” ते म्हणाले.
“कां?”
राज कपूरने विचारलं.
“कारण की तुमचं
हार्ट खूप मोट्ठं आहे, येवढ़ं मोठं हार्ट
घेऊन जगणं खूपच धोक्याचं आहे,” ते म्हणाले. “कारण
की येवढं मोट्ठं हार्ट जगांत कोणाचेच नाहीये! ज़रा विचार करा,
जर तुमच्या हार्टमधे सगळं जग सामावून जाईल, तर काय होईल?!”
आणि राजकपूर गाणं
म्हणूं लागला. मी हे सुद्धा विसरून गेलो की माझ्या शेजारी नास्त्या बसलीये. माझ्या
मनांत इतकी खळबळ माजली होती की माझे दात घट्ट मिटले होते,
आणि मी उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट इतके घट्ट धरले होते की ते
दुखायला लागले होते.
सुरूवातीचा जवळ-जवळ
अर्धा तास नास्त्या शांतपणाने बघत होती. मग ती हसायला
लागली. राजकपूरची मम्मा मरते आहे, त्याच संध्याकाळी
तो अरेनांत येतो आणि मुलांना हसवतो, आणि ‘शो’
झाल्यावर काळा चष्मा लावतो, ज्याने कोणाला
त्याचे अश्रू नाही दिसणार...आणि ही नास्त्या हसतेय!
“ओय,
चष्मा कसा आहे त्याचा – एकदम सुपर!” ती म्हणते.
“नास्त्या,”
मी मिटलेल्या दातांमधून तळमळतो, “ही फिल्म सन्
सत्तरची आहे!”
पण नास्त्याला
त्याने काही फरक पडंत नव्हता की फिल्म कोणत्या सालाची आहे. जेव्हां राजकपूरने
आपल्या समोर जुन्या चिंध्यांचा बनवलेला जोकर-बाहुला ठेवला आणि स्कूल टीचरशी
झालेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या असफल प्रेमाबद्दल सांगू लागला,
तेव्हां मला नास्त्याकडे बघायचीसुद्धां भीती वाटूं लागली. मला फक्त
येवढंच ऐकू येत होतं की ती अति प्रयत्नाने आपलं हसू आवरतेय.
जवळ-जवळ वीस मिनिटं
अत्यंत तणावाखाली आम्ही फिल्म बघंत होतो. नास्त्याने आपले गाल हातांत धरले होते,
आणि स्क्रीनकडे न बघण्याचा प्रयत्न करंत होती. मला मात्र वाटंत होतं की
माझ्यांत इतक्या प्रचंड शक्तिचा संचार झाला आहे की मी नुसत्या नज़रेने सूर्याला
नेहमीसाठी विझवून टाकेन. राज कपूर समुद्राच्या काठावर एका कुत्र्याला कुरवाळंत
होता.
“सिर्योग,
फिल्म बरांच वेळ चालणारेय कां?” शेवटी नास्त्याने
विचारलेच.
जणु मला
चिडवण्यासाठीच रिमोट कुठेतरी निसटला होता. मी त्याला धुंडलं,
कैसेट थांबवली, वीडियो-प्लेयरमधून
बाहेर काढली, परत डब्यांत ठेवली आणि डब्यावरून नज़र न
हलवतां हळू-हळू म्हटलं:
“सोवियत
बॉक्स-ऑफ़िसमधे ही फिल्म दोन तासांपेक्षा थोडीशी जास्त होती. पण,
माझ्याकडे – पूर्ण , ओरिजिनल फ़िल्म आहे.
तीन तास आणि चाळीस मिनिटांची.”
“कठीण काम आहे,”
नास्त्या म्हणाली.
“कठीण,”
मी म्हटलं आणि टेबलवार ताल देऊं लागलो.
“सिर्योग,”
नास्त्याने भुवया उंचावल्या, “तुला हे सगळं फ़नी
नाही वाटंत? बघ, कसा आहे तो,
बुढ्ढ्या खुंटासारखा, पण चालला आहे,
चालला आहे, स्वतःसाठी मुलगी
शोधतोय! आणि जेव्हां सगळे त्याला काढून टाकतात, तेव्हां
बसल्या-बसल्या आपल्या बाहुल्याजवंळ फिर्याद करतो!”
“नाही,”
मी म्हटलं, “मला ह्यांत काहीच
फनी वाटंत नाही.”
“ नुसतं पांचट!”
नास्त्याने म्हटले. “चल, त्यापेक्षां, मी काही म्यूज़िकच
लावते.”
मी टेबलवरून लाइटर
उचलला, क्लिक केला आणि त्याच्या ज्वाळेकडे पहात राहिलो.
“म्यूज़िक तर तुला
केव्हांही ऐकता येईल, पण ‘मेरा नाम जोकर” ही
फिल्म तुला जगांतला कोणतांच तरूण नाही दाखवणार.”
“थैन्क्स गॉड,”
नास्त्या खुद्कन हसली.
त्यानंतर आम्ही
कधीच नाही भेटलो.
जातां-जातां
नास्त्याने ठामपणे सांगितले कि पहिले मी तिला फोन केला पाहिजे. पण मी फोन नाही
केला. काही दिवसांपूर्वी मला आन्या भेटली. मी तिला ‘मेरा नाम जोकर’
नाही दाखवणार, तिला मी ‘श्री 420’
दाखवेन, त्यांत राजकपूर खूप तरूण आहे,
आणि त्यांतले गाणे पण मस्त आहेत.
The
subsequent chapters of this section narrate the protagonist’s interaction with
a smart boy Vovets : Vovets lives in his building and he is in love with the
heroine of “Star Wars”! Our hero is quite impressed, but when the experience of
printing photographs in Vovets’ flat turns scary, he prefers to stay away from
him.
Attempt
to become a para-psycho Healer turns into a fiasco in class V and he is
ridiculed by the whole class.
His
love for football is shown in the next chapter, he is unable to decide which
team he should cheer up. Here we notice that the social circle of the
protagonist is slowly widening and he is able to differentiate between good
people and bad people, between good behavior and bad behavior and is able to
select where he should be…
Love affair with Tanya is very touching…! knowing fully well that their
parents won’t agree for their marriage as there was this discrimination between
the intellectual and non-intellectual classes. The protagonist and Tanya decide
to run away from their houses, they reach a comfortably safe place behind the
petrol pump, but it starts raining and they feel hungry and cold, so they
decide to return to their respective houses and meet after thirteen years when
they become 18 years old and marry…
The last chapter of this section is quite sentimental when Seryog dreams
of August and the old time when there used to live a shepherd nearby (His
grandmother had narrated stories about the olden days…)
Thus, we note that the child lives in a much closed, protective world.
Almost no interaction with anybody but towards the end his emotional world is
getting richer.
Now, coming to the the second part which
is titled as “The Indian Films” Here the
narrator tells about himself, his cousin
brother Vladik, his grandmother Tonya and great grandmother Natasha. Special
mention deserves grandfather Partos (Motya) and some neighbors.
This part narrates the life of
protagonist in Smolensk. For the child this is the Golden period of his life.
Close proximity only with his cousin and details about Indian Films; how he
came to see the first Indian film and how it left a lasting impression on the
heart and mind of the protagonist. Only in the Conclusion the readers come to
know about his life in Moscow, which too, he realizes, he loves and without
these fantastic neighbors his existence is incomplete.
Let us see the chapter “India – 2 parts”
in this section.
But before proceeding ahead, it
would be nice to see what the author personally thinks about India and Indian
films and why they have left a lasting impression on his mind. In a personal
communication he writes:
I am very glad that you have
translated my book into Hindi. (Marathi version too is translated
simultaneously – both are yet to be published – ACR) .
“What is India for me – it is also
difficult to explain. Somehow I feel that it is my SECOND MOTHERLAND, and
though, except the films, I don’t know anything and haven’t seen anything
related to India, but somehow I know that people in your country are very kind
and friendly.
You are asking how I started
loving Indian films. Well, it began in the summer of 1985. I was seven years
old. And I went to watch a movie in a theatre near our house. They were showing
Indian film Samraat. It happened just by chance. I had never seen any Indian
film till then. When we saw it, I understood that I had never seen anything
brighter, more interesting and more beautiful in my life. It was like “Dream come true”, incarnation of
happiness for me.
During that week I watched Samraat
three times and I still watch this film again and again.
Now a days, it is possible to find
everything on the internet and I still watch not only Samraat, but also Disco
Dancer, Sholey, Vidhaata, Taqdeer…
And so, in the year 1985, after
“Samraat” I knew that if the film is Indian, it means that I have to cross the
whole of Moscow, if need be, and watch it.
I maintained a small note book, while I was in school, where I noted the
names of those Indian films which I had seen and in a few years there were more
than 100 titles in that note book.
When I was about 12-13 years old,
Mr. Amitabh Bachchan had visited The Moscow International Film Festival. I
waited near the hotel ‘Russia’ where he stayed and I managed to see him. I
liked him terrifically, and later I even tried to walk his gait.
Even now I try to follow Bollywood
News, but I like the films of 1970s- 1980s”
Sergei Vladimirovich admires
Amitabh Bachchan and Mithun Chakravarty, he not only enjoys the films but keeps
track of their Director, Music director etc, Let us see how this has found
reflection in ‘The Indian Films’:
इण्डिया,
दोन सिरीज़....
पहिली इंडियन
फिल्म, जी मी बघितली होती,
ती होती फिल्म ‘सम्राट’. आणि फिल्म बघितल्यानंतर मी लटपटत्या पायांनी, तोंड उघडं
ठेवून, आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देतां आणि सारखं चुकीचं वळण घेत, घरी चाललो होतो आणि क्वार्टरमधे घुसतांच मी म्हटलं:
“तोन्, तुला माहित आहे कां,
की हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण आहे?’
“अरे,” तोन्या आजीने आश्चर्याने विचारले, “हिटलरपेक्षांही
जास्त वाईट कोण बरं असूं शकतो?”
थोडा वेळ शांत राहून
आणि दूरवरच्या मुम्बईहून घरी येता-येता मी म्हटलं:
“बॉस.”
निश्चितंच! तो
हिटलरपेक्षां कितीतरी पटींनी दुष्ट आहे, कारण त्याने
कैप्टन चावलाला कित्ती वर्षं तळघरांत कैदेंत ठेवलं होतं. कैप्टन चावलांच एकटा असा
माणूस होता, ज्याला सोन्याने भरलेल्या जहाज ‘सम्राट’ला समुद्रांत कुठे बुडवलंय,
ती जागा माहीत होती! आणि कैप्टन चावलाने त्या
जहाजाला बॉसच्या हुकुमानेच बुडवलं होतं! आणि जर फिल्मचे खास हीरो राम आणि राज नसते, तर माहीत नाही आणखी किती वर्षं त्याने दुष्टपणाची कामं केली असती.
मी व्लादिकला
तपशीलवार ‘सम्राट’ची गोष्ट सांगतो,
आणि आम्हीं लगेच ही फिल्म बघायचं ठरवतो.
व्लादिकलापण फिल्म खूप आवडते,
पण फक्त जेव्हां आम्हीं हॉलमधून बाहेर पडंत
होतो, तेव्हां तो म्हणाला,
की शेवटच्या सीनमधे बॉसला फक्त तीन गोळ्या
मारल्या होत्या,
वीस नाही, जसं मी त्याला सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं की वीस होत्या!
आणि
त्याच्यानंतर मी लागोपाठ एका मागे एक “तकदीर”, “जागीर”, “हुकूमत”, “शोले”,
“मुझे इन्साफ़ चाहिए!” – ह्या फिल्म्स बघितल्या
आणि मला आता माहितीये की तो,
जो “सम्राट” फिल्ममधे रामचा रोल करंत होता – तो एक्टर धर्मेंद्र आहे, “शोले”मधे तो वीरूचा रोल करंत होता, आणि तो, जो बॉस होता,
- तो अमजद खान आहे, तो “शोले”मधे
तसल्यांच घाणेरड्या माणसाचा रोल करंत होता, फक्त आता
त्याचं नाव होतं गब्बर सिंग. मग मी “शक्ति”, “खुद्दार”, “मुकद्दर का सिकंदर”,
“त्रिशूल”, आणि “जंजीर” बघितली आणि मी अमिताभ बच्चनच्या
प्रेमातंच पडलो,
जो ह्या सगळ्या फिल्म्समधे आणि, “शोले”मधे सुद्धां प्रमुख रोल करतोय, आणि सगळ्यांत
त्याचं नाव विजयच आहे. जर मला कधी मुलगा झाला, तर मी त्याचं
नाव विजयंच ठेवीन,
अमिताभच्या प्रेमाखातर.
मग थियेटर्समधे
राजकपूरची “आवारा” आणि “डिस्को डान्सर” दाखवतात. ‘इण्डिया, दोन सिरीज़’
चा अर्थ माझ्या साठी हा आहे, की मला जावंच लागेल,
कारण, फिल्म चांगलीच
असेल, आणि मी ताबडतोब दोन्हीं फिल्म्स बघण्यासाठी धावतो. “आवारा” तर मला खूपंच
आवडते. पण चार वेळां “डिस्को डान्सर” बघितल्यावर (त्यांत हीरो आहे मिथुन चक्रवर्ती
– हा तोच आहे,
ज्याने “जागीर”मधे फ़ैक्ट्री-मालक रणधीरच्या
लहान भावाचा रोल केला होता) मला चांगलंच समजलंय की मोठा झाल्यावर मी एक्टरंच होईन, आणि “डिस्को डान्सर – 2” मधे काम करेन, मिथुन
चक्रवर्तीबरोबर. आणि,
अचानक “डिस्को डान्सर-2” येते! पण ह्या
फिल्मचं नाव आहे “डान्स डान्स!” मुख्य रोल पण मिथुन चक्रवर्तीनेच केला आहे, डाइरेक्टर सुद्धां तोच बब्बर सुभाष आहे, ऑपरेटर राधू
करमाकरचं आहे,
तोच म्यूज़िक डाइरेक्टर – बप्पी लहरी आहे!
जेव्हां मी ‘वर्कर्स वे’
मधे ‘सव्रेमेन्निक’ थियेटरची घोषणा आणि हे वाक्य बघितलं: “फिल्म “डिस्को डान्सर”च्या सोवियत फैन्स
साठी”, तेव्हां पाच मिनिटासाठी मी जणु आनंदाने मरूनंच गेलो! आणि न जाणे कां, हे पण आवडलं की “डिस्को डान्सर” फक्त मलाच नाही, तर सगळ्यांच
सोवियत दर्शकांना आवडतो!
मग एक वेळ अशी
देखील येते, जेव्हां आमच्या शहराच्या थियेटर्समधे इंडियन फिल्म्स येतंच नाहीत. मी ‘09’ ह्या नंबरवर शहराच्या सिनेमा- डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमधे फोन करून विचारतो की
कोणची नवी इण्डियन फिल्म दाखवणार आहे कां. मला सांगण्यांत येतं की लवकरंच “प्यार
करके देखो” नावाची फिल्म येणार आहे आणि रिसीवर ठेवून देतात. मी विचारूं सुद्धा
शकलो नाही की त्या फिल्ममधे कोण-कोणचे एक्टर्स आहेत. पुन्हां फोन करतो, विचारतो,
की “फिल्म प्यार करके देखो”चा हीरो कोण आहे.
मला कळायला तर पाहिजे नं की कोणाला पसंत करूं आणि कोणावर विश्वास ठेवू! त्यांना
खूप आश्चर्य होतं,
की मला ह्या गोष्टीत उत्सुकता आहे, पण टेलिफोनवाल्या बाईने हसून म्हटलं की जेव्हां फिल्म दाखवतील तेव्हां
कळेलंच, की त्यांत कोण-कोण काम करतं आहे. पण मला तिच्या बोलण्याचा टोन नाहीं आवडला.
मी पुन्हां फोन करतो,
आणि आवाज़ बदलून विचारतो, की एखाद्या थियेटरमधे “डिस्को डान्सर” दाखवणार आहेत कां. मला मरगळलेल्या
आवाज़ात उत्तर मिळतं की नाहीं दाखवणार.
जेव्हां सकाळी
मी पुन्हां फोनवर विचारतो, की आमच्या शहराच्या थियेटर्समधे इण्डियन फिल्म्स दाखवणार आहेत कां, तेव्हां ते लोक मला ओळखून घेतात:
“मित्रा, तू काय
झोपेंतसुद्धां विचार करंत होतास,
की कुठे फोन करायचा आहे?”
आता मी त्यांना
फोन नाहीं करंत. चांगलं नाही वाटंत. पण, मी त्यांचा
मित्र कसा काय झालो?!
In the second part
along with Indian films the author narrates about his other relatives : His
cousin brother, his grandfather, his great grandmother, some neighbors. We
notice that slowly the social circle is widening, the child is getting
experience of life. But, as in the Soviet literary works, we notice that all
those who meet and influence him are of positive character, he moves away from
a couple of negative persons.
Narrator’s relation
with his cousin brother Vladik is special. Together they do many adventurous
and creative things: They make films, show them to the members of family; they
write novels – a number of them, they try to become salesman….
The concluding part
of the novel shows the present life of author in Moscow. Those, who are his
neighbors and those who live in the building are depicted beautifully with all
their whims and fancies. But the author knows that life is not complete without
any of them, He has a tendency to love everybody, a sensitive soul who makes
you believe that life is still beautiful.
Most beautiful is
the scene in the rain when the child is coming back with his grandparents…
...मी आणि
तोन्या आजी संध्याकाळी उशीरा,
जवळ-जवळ रात्रीच समर कॉटेजमधून परत येत आहोत.
जूनचा महिना आहे. अंधार होऊं लागला आहे, जरी ह्या
काळांत सर्वांत मोठे दिवस असले तरी. दुर्गंध सोडणारी नदी पार करून टेकडीवरून खाली
उतरतो आणि बघतो काय,
की आम्हांला भेटायला आजोबा येत आहेत, ते घरी नाहीं थांबू शकले,
कारण की त्यांना काळजी वाटंत होती: न्यूज़
प्रोग्राम ‘व्रेम्या’मधे घोषणा केली होती,
की सर्वांत भयंकर वादळ येणार आहे. आजोबा
कितीदांतरी म्हणाले,
की आम्हांला वेड लागलं आहे, नाहीतर अकरा वाजेपर्यंत बगिचांत नसतो बसलो, आणि आजी
त्यांना उत्तर देणारंच होती, की तेवढ्यांत ते वादळ आलंच. विजांचा कडकडाट, घोंघावणारे वारे, सगळ्या वस्तु थरथरंत होत्या,
आणि मला भीति वाटंत होती आणि आनंदही होत होता, आणि एका सेकंदातंच आमच्या अंगावरचे सगळे कपडे चिंब झालेले होते.
मिलिट्री
एरियाच्या अरुंद पायवाटांवरून आम्हीं एका झुण्डांत धावतो; तोन्या आजी आणि आजोबा खो खो हसताहेत, हे बघून की मी
कसा आपले सैण्डल्स आणि मोजे काढून पाण्याच्या डबक्यांत छपछप करतोय. मला पण त्यांना
हसवणं आवडतं: मी डान्स करूं लागतो,
आणि जोरजोरांत “डिस्को डान्सर” मधलं माझं
आवडतं गाणं म्हणूं लागतो: “गोरों की ना
कालों की-ई-ई! दुनिया है दिलवालों की. ना सोना-आ! ना चांदी-ई! गीतोंसे-ए, हम को प्या-आ-आ-र!!!” (गाण्याचा अर्थ असा आहे – खायला प्यायला आमच्याकडे
पुरेसे पैसे नसूं देत,
पण स्वातंत्र्य आणि गाणं – हीच माझी दौलत आहे – हे सिर्गेइ पिरिल्याएव ने लिहिलंय -ACR ). जेव्हां आम्हीं आपल्या कम्पाऊण्डमधे
पोहोंचतो, तरीही मी गातंच असतो,
पण इतक्या जोरदार आवाजांत की शेजारी-पाजारी
खिडक्यांमधून पाहूं लागतात;
पण मला काही फरक पडंत नाही – उलट आणखी जास्त
गाण्याची आणि डान्स करण्याची इच्छा होऊं लागते.
घरी गेल्यावर
आम्हीं यूडीकलोनने आंघोळ करूं,
म्हणजे नंतर आजारी नाही पडणार, मग आम्ही पैनकेक्स खाऊं,
पणजीआजी नताशाने सकाळीच पेनकेक्स बनवण्याचं
प्रॉमिस केलं होतं,
आणि उद्या आहे सण्डे, व्लादिक येईल आणि आम्हीं अभ्यासाव्यतिरिक्त आणखी एखाद्या आयडियाबद्दल विचार
करूं, जसं बुटक्यांचा बिज़नेस करणं किंवा एखादी कादम्बरी लिहिणं...
काही
महिन्यांनी मी नेहमीसाठी स्मोलेन्स्क सोडून निघून जाईन, जिथे हे सगळं, तुम्हांला सांगितलेलं,
झालं होतं. एका नवीन जीवनाचा आरंभ होईल, नवीन हीरोज़सोबत,
नवीन एडवेन्चर्स बरोबर, ज्यांच्याबद्दल मी इथे काहींच सांगणार नाही, कारण
त्याच्यासाठी वेगळ्या पुस्तकाची गरज आहे. कदाचित्, ते जास्त गंभीर, जास्त दुखी असेल...आणि हे पुस्तंक, जर तुम्हांला
हसवणारं, आनंद देणारं जमलं असेल,
तर ह्याला इथेच संपवणं जास्त चांगलं आहे. मला
विश्वास आहे,
की पुन्हां असा काळ येईल जेव्हां आम्हीं
आनंदाने बागडंत सिनेमा थियेटर्समधे जाऊं आणि इण्डीयन फिल्म्स बघूं. तेव्हां मी
नवीन एक्टर्सवर पण तेवढंच प्रेम करूं शकेन, जसं मी मिथुन
चक्रवर्तीवर आणि अमिताभ बच्चनवर केलंय,
आणि पुन्हां पावसांत अनवाणी पायांने डान्स
करतांना इण्डियन गाणी म्हणेन,
शेजारी आपाआपल्या खिडक्यांमधून आश्चर्याने
बघताहेत, बघूं देत आणि आश्चर्य करूं देत – अगदी तसंच, जसं कित्येक
वर्षांपूर्वी झालं होतं...
So, that’s “The
Indian Films” for you!
Translating the
book into Hindi and Marathi was not difficult, but there were a few instances
which required some special efforts work: For example the names of the films
and words of the song – Goron ki na kalon ki” The child writes as he hears
it…and this translation doesn’t give you a clue about the exact song. Similarly
names of the actual films are changed according to the story and giving the
real Hindi title demanded real hard work…
In short, this is
not a fiction, this is the real life of the author, power of Cinema, depiction
of love for life. And it is pleasant to see how the films bring people of
Russai and India together.
He says in the Epilogue:
लेखकाचे मनोगत...
माझा जन्म
सुप्रसिद्ध हीरो-सिटी स्मोलेन्स्कमधे सन् 1978मधे झाला आणि मी तिथे सेप्टेम्बर
1985पर्यंत राहिलो. स्मोलेन्स्कमधे माझे जवळ-जवळ सगळे जवळचे नातेवाईक राहायचे, मम्मीकडचे आणि पापांकडचेही.
माझे
मम्मी-पापा नौकरी करायचे (पापा सैन्यात होते, आणि मम्मी
रेडिओ स्टेशनवर),
आणि मी नर्सरी शाळेत जायचो, तिथे मी बरेंचदा आजारी पडायचो,
म्हणून मी बराच काळ आजी-आजोबांकडे राह्यलो.
म्हणूनंच माझ्या ह्या लघु कादंबरिकेत आजीची, पणजीआजीची, आणि आजोबाची गोष्ट आहे. आणि व्लादिक – माझा मावस भाऊ आहे – मम्मीची बहिण –
स्वेता आण्टीचा मुलगा. त्यांचे कुटुम्बसुद्धां स्मोलेन्स्कमधेंच राहायचे. आणि तसं
पण – माझ्या गोष्टींचे बाकी पात्रंसुद्धां खरेखुरेच आहेत – ते त्या काळांत आमच्या
कम्पाऊण्डमधे राहायचे,
किंवा माझ्या नातेवाइकांचे मित्र होते. मी
एकही काल्पनिक प्रसंग लिहिलेला नाहीये.
त्याकाळचे
स्मोलेन्स्क म्हणजे एक शांत,
हिरवळीनं बहरलेलं शहर असयाचं, ज्यांत,
म्हातारपणामुळे चरमरंत ट्रामगाड्या घसटायच्या.
सामूहिक फार्मच्या बाजारांत आमच्या आवडीचे बियाणे, कलिंगड आणि
चेरीज़ विकायचे,
आणि शहरांतल्या सिनेमा हॉल्समधे वेगवेगळ्या
प्रकाराच्या,
नव्या आणि जुन्या इण्डियन फिल्म्स
दाखवायचे....
आज तो काळ मला
स्वर्गासारखा वाटतो,
ज्याला, मला वाटतं, मी कधीच विसरूं नाहीं शकणार. आम्हीं मॉस्कोला आल्यावर पण, जवळ-जवळ सन् 1994पर्यंत मी सगळ्या सुट्ट्या आणि सगळे उन्हाळे
स्मोलेन्स्कमधेच घालवायचो,
स्वर्गाच्या अनुभवाला खूप वेळ अनुभवायच्या
प्रयत्नांत, कारण तिथेच माझं खरं जीवन होतं. आणखी कोणत्याही शहराने आणि देशाने मला कधीच
आकर्षित नाहीं केलं,
हे सांगताना घाबरणार नाहीं, की मी जणु तिथेच बंदिस्त झालो होतो. सन् 1998मधे माझे आजोबा वारले (‘इण्डियन फिल्म्स’
ह्या लघु-कादंबरिकेचे पर्तोस) आणि स्वर्गाची
जाणीव संपली. मी स्मोलेन्स्कला जात राहिलो, पण ही वेगळ्याच
प्रकारची ट्रिप असायची.
सन् 2005मधे मी
मॉस्को स्टेट युनिवर्सिटीतून जर्नलिज़्मचा कोर्स पूर्ण केला, सुरुवातीला एका प्रकाशनगृहामधे काम केलं, मग रेडिओवर, पण लेखकांसाठी आयोजित केलेल्या सेमिनार्समधेही मी जायचो, माझ्या रचना प्रकाशित होत होत्या, आपल्या गोष्टी
आणि कविता मी वेगवेगळ्या पब्लिक फोरम्समधे प्रस्तुत करंत होतो (तसं तर लहानपणीच मी
लिहायला सुरुवात केली होती,
पण काही व्यवस्थित जमलं नाहीं). लेखिका मरीना
मस्क्वीना, कवियत्री एवम् अनुवादिका मरीना बरदीत्स्काया, कवियत्री
तात्याना कुज़ोव्लेवाया,
आलोचक इरीना अर्ज़ामास्त्सेवाया, कवियत्री आणि नाटककार एलेना इसायेवा आणि एडवर्ड निकोलायेविच उस्पेन्स्की –
ह्या मंडळींशी संवाद करणं फार अवघड वाटायचं. एडवर्ड उस्पेन्स्कीने जेव्हां माझ्या
रचनांची तारीफ़ केली,
तेव्हां मला विश्वास वाटू लागला, की मी लेखक आहे. मी इरीना युरेव्ना कवाल्योवाचा आभारी आहे, ज्या लीप्कीमधे आयोजित तरूण लेखक मंचाच्या आयोजकांपैकी आहेत, ज्यांत मी सन् 2004मधे भाग घेतला होता, त्यांच्याकडून
मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आणि प्रेमळ वागणुकीसाठी धन्यवाद देऊं इच्छितो.
मी विशेषकरून
मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न नाही केला – बस, मनांत येईल ते
लिहीत गेलो, उलट मी मोठ्यांसाठीच लिहीत होतो. पण, तरीही, मला मुलांचा लेखक म्हणूं लागले. ठीक आहे, मी विरोध नाही
करंत.
जे लोकं हे
पुस्तक वाचतील त्यांना अगदी हृदयांतून धन्यवाद. आणि ज्यांना हे आवडेल, त्यांना आनंदाने आपला मित्र समजेन.
So. This is the power
of Art, strength of Indian Films, which have been playing a big role in the
Russian - Indian Friendship!